dr.satish best web design developer for mac

निलजी ग्रामपंचायत :

हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं, सुख-समाधानाने बहरलेलं, माणसाची माणुसकी जपणारं, हिरण्यकेशी नदीच्या काठी असलेल व महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेलं गडहिंग्लज तालुक्यातील निलजी हे आमचं गाव. अतिशय सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव आहे. गावच्या बाजूने हिरण्येकेशी नदी वाहत असल्याने बागायती शेतीसाठी बारा महिने नदीपात्रामध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. गांव संपुर्णपणे हागणदारी मुक्त झालेले असुन गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसवीलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मल ग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. व्यसनमुक्त गाव झालेले आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्केआहेत. गाव तंटामुक्त आहे. तसेच अंतर्गत गटारींची बांधकाम चंगल्या पध्द्तीने केलेली आहे. गावात रात्रीचा अंधार कमी करणेसाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायती मार्फतसुरळीत पाणीपुरवठा, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड इ. कार्यक्रम राबविले जातात.

-

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनाच्या येणाऱ्या योजना राबविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानांमार्फत निर्मल ग्राम पुरस्कार 2008 – 2009 प्राप्त झाला आहे. तंटामुक्त पुरस्कार 2011 – 2012 प्राप्त झाला आहे. गावामध्ये पर्यावरण संतुलित ग्राम योजनेमधून वृक्षलागवड केली गेली. जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत 150 रोपाची लागवड करण्यात आली आहे.

सरपंच
सौ. पदमश्री सत्याप्पा अम्माणावर

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. दुंडाप्पा शटगोंडा पाटील

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
सौ. साधना सुधाकर गवळी

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Nilaji Grampanchayat
A/p - Nilaji Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416501

CONTACTS
Phone :

Office : 02327– 268819